सिमोन गिर्ट्झ यांचं एक हसतंखेळतं मजेशीर हृद्य भाषण. यात आहेत त्यांनी स्वतः बनवलेल्या चित्रविचित्र अद्भुत वस्तूंची प्रात्यक्षिकं. निरुपयोगी यंत्रं बनवण्याच्या आपल्या कलेची ओळख त्यांनी इथे करून दिली आहे. भाजी चिरणे, केस कापणे, लिपस्टिक लावणे, आणि अशीच इतर अनेक कामं करण्यासाठी त्यांनी बनवलेली यंत्रं कुचकामी ठरली आहेत. आणि हाच मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतो. त्या म्हणतात, "आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठाऊक नाहीत हे कबूल करणं, हीच तर निरुपयोगी गोष्टी बनवण्यामागची खरी मजा आहे. त्यामुळे काय होतं, तर आपल्याला जगातलं सगळं ठाऊक आहे, असं सांगणारा तो आपल्याच डोक्यातला आवाज गप्प बसतो. टूथब्रश हेल्मेट हे उत्तर नसेल, पण आपण निदान प्रश्न तरी विचारला, हे महत्त्वाचं."
