शमीम अख्तर यांनी बालपणी मुलाचा वेष धारण केला. त्यामुळे, पाकिस्तानी मुलींना न मिळणारं स्वातंत्र्य त्यांना अनुभवता आलं: म्हणजे मोकळ्या जागेत खेळणे, शाळेत जाणे. आपले डोळे उघडणाऱ्या या हृदयंगम व्याख्यानात शमीम अख्तर सांगताहेत, शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशा कशी बदलली. त्यांच्या प्रभावामुळे शेवटी त्यांच्या गावातली संस्कृतीही बदलली. आज त्यांच्या गावातली प्रत्येक लहान मुलगी शाळेत शिकत आहे.

