दोन वेगळ्या कारणांसाठी दोन वेगळी औषधं घेणाऱ्यांसाठी एक गंभीर विचार: ती दोन औषधं एकत्र घेतल्याने नेमकं काय घडतं, हे तुमच्या डॉक्टरला पूर्णपणे माहीत नसण्याची शक्यता आहे. कारण, औषधांच्या परस्परक्रियांचा अभ्यास करणं अत्यंत कठीण असतं. "सर्च इंजिन मधले शोधप्रश्न" हा आश्चर्यजनक स्रोत वापरून, औषधांच्या अनपेक्षित परस्परक्रियांचा अभ्यास डॉक्टर कसा करतात, ते या मनोवेधक आणि सोप्या भाषणात रस आल्टमन दाखवून देताहेत.

