पार्किन्सन्स बरोबरच्या आयुष्यावर साधे उपाय
साधे उपाय बरेचदा सर्वोत्तम असतात, अगदी पार्किन्सन्स सारख्या गुंतागुंतीच्या विषयावर सुध्दा. या प्रेरणादायी भाषणात मिलेहा सोनेजी दाखवताहेत उपलब्ध रचना, ज्या पार्किन्सन्स बरोबर आयुष्य जगणाऱ्या जगणाऱ्या लोकांची रोजची कामं थोडी सुलभ करतात. "तंत्रज्ञान हेच काही सर्व प्रश्नांचं उत्तर नव्हे," त्या म्हणतात. "आपल्याला हवीत माणसाला केंद्रस्थानी ठेवून शोधलेली उत्तरं."
