संघर्ष टाळणे ही बहुतांश लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती असते, पण मार्गारेट हेफरनन आपल्याला सांगतात की चांगले मतभेद हे प्रगतीचा केंद्रबिंदू असतात. त्या दाखवतात की (काही वेळेस अंतर्ज्ञानाच्या विरोधात जाऊन) उत्तम सहकारी नुसती री ओढण्याच काम करत नाहीत - आणि उत्तम संशोधक संघ, नाती आणि उद्योग हे लोकांमधल्या गहन संघर्षाला अनुमत करतात.

