ताण ज्यामुळे तुमचे हृदय धडधडते श्वसन जलद होते कपाळावर घाम येतो .ताण हा आरोग्याचा शत्रू आहे असा समाजात समज आहे .मात्र नवे संशोधन सूचित करते तुमची अशी धारणा असेल की ता ण हानिकारक आहे तर त्या धारणेने तुमच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होईल.ताणाला मित्र माना व आरोग्य प्राप्त करा हे तळमळीने सांगत आहे मानसिक आरोग्यविशारद केली मकगोनिगल ताणाकडे सकारात्मक रित्या पाहून शरीराच्या अनोख्या बचाव तंत्राची ओळख त्या सर्वांना करून देत आहेत.
