आपल्याला ताप येत असेल किंवा आपलं अंग दुखत असेल, तर आपण डॉक्टरकडे जातो. पण अपराधी वाटणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा एकटेपणा यासारख्या मानसिक दुखण्यासाठी तज्ज्ञांकडे का जात नाही? गाय विंच म्हणतात, सर्वसाधारणपणे अशा मानसिक दुखण्यांना आपण एकटेच तोंड देतो. पण तो काही एकमेव मार्ग नव्हे. आपण आपलं मानसिक आरोग्य सांभाळायलाच हवं. जितक्या काळजीपूर्वक आपण आपलं शारीरिक आरोग्य जपतो, तितक्याच काळजीने आपलं मन आणि भावना जपायला हव्यात.
