एथन लिसी म्हणतो, "स्वमग्नता हा रोग नव्हे, तर विचार करण्याची एक वेगळी पद्धत आहे." या व्याख्यानात त्याने घेतलेल्या जगाच्या अनुभवाची एक झलक दाखवून तो स्वमग्नतेबद्दल दिशाभूल करणारी साचेबंद वर्णनं खोडून काढतो. तसंच पुनरावर्ती वर्तन आणि ते लपवण्याबद्दलची माहिती देऊन समाजाची स्वमग्नतेविषयी सर्वसमावेशक समज वाढवतो.
