डेरेक सिव्हर्स (Derek Sivers): तुमची ध्येये कुणालाही सांगू नका
आपण जेंव्हा आयुष्याची नवीन दिशा आखतो, तेंव्हा साहजिकच आपल्याला ती बातमी कुणालातरी सांगाविशी वाटते. पण डेरेक सिव्हर्स म्हणतात की अशी बातमी गुप्त ठेवलेली जास्त फायद्याची ठरेल. सन १९२०-पासून केलेल्या संशोधनाचा उल्लेख करून ते दाखवून देतात की आपल्या महत्त्वाकांक्षा बोलून दाखवणारे लोक त्या प्रत्यक्षात आणताना कमी यश मिळवतात.
