'लोकांशी उत्तम संभाषण करता येणं' या कौशल्यावर अवलंबून असणारा व्यवसाय करता करता त्यात प्राविण्य वाढत जातं. त्याबरोबरच हेही समजतं, की आपल्यापैकी अनेकांना चांगलं संभाषण करता येत नाही. सेलेस्ट हेडली या गेली काही दशके एक रेडिओ मुलाखतकार म्हणून कार्यरत आहेत. उत्तम संभाषणाचे घटक त्या जाणतात: प्रामाणिकपणा, नेमकेपणा, स्पष्टपणा, आणि लक्षपूर्वक ऐकणे. या बोधप्रद व्याख्यानात त्या सांगताहेत उत्तम संभाषणाचे दहा मार्ग. त्या म्हणतात, "जा, लोकांशी बोला, त्यांचं बोलणं ऐका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आश्चर्यचकित होण्याची तयारी ठेवा."
